मोकाट गुरे ठोस कारवाई साठी आचरा ग्रामस्थ आक्रमक

लेखी निवेदनाद्वारे मागितली कारवाई ची माहिती

मोकाट गुरांचा प्रश्न आचरा गावात चांगलाच भेडसावत आहे.याबाबत तात्काळ बंदोबस्त करुन केलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी रुपय टेमकर यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी श्रीमती माधुरी कामतेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी रुपेश मंगेश टेमकर यांच्या सोबत गणेश पाटकर, दर्पण आचरेकर,गौरव पेडणेकर आदी उपस्थित होते.या निवेदनात

आचरागावातील मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत आहेत यामुळे वाहतूकीस गंभीर अडथळा निर्माण होत आहे.यातून रस्त्याने येजा करणारे वाहनचालकांचे छोटेमोठे अपघात होत असतात.भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर बाबत यापूर्वी आचरा ग्रामपंचायत येथे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता.त्यावर ग्रामसभेत गुरे मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.अद्यापही मोकाट गुरांचा त्रास कमी झाला नाही.
तथापी सदर अर्जावर कोणती कार्यवाही करण्यात आली.याबाबत लेखी माहिती मिळावी, भविष्यात अपघात झाले तर त्याची जबाबदारी कोणाची राहिल याबाबत स्पष्ट करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!