न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे या उद्देशाने
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वनराई आणि HDFC बँक परिवर्तन यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि वनराईच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव करून देणारा ठरला. वृक्षारोपणासारख्या छोट्या कृतींद्वारे भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि निरोगी पर्यावरण निर्माण करता येते, हा संदेश सर्वांना देण्यात आला

error: Content is protected !!