एलएलबी परीक्षेत कणकवलीच्या मैथिली बगळे हिचे यश

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केला मैथिली बगळे हिचा सत्कार
कणकवली कनकनगर येथे राहणारी, कणकवलीची सुकन्या मैथिली निकिता निळकंठ बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथून विधीतज्ञ अर्थात ॲडव्होकेट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे.
मैथिलीच्या या यशाबद्दल समीर नलावडे संपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी तिचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
मैथिली बगळे हिचे दहावीपर्यंत शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल येथे झाले. त्यानंतर तिने मुंबई रुपारेल कॉलेज येथे आपले बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कायदेविषयात जास्त ओढा असल्याने मैथिली हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथे एलएलबीसाठी प्रवेश घेतला. काही दिवसापूर्वी जाहीर झालेल्या निकालात मैथिलीने प्रथम श्रेणीत एलएलबी पदवी उत्तीर्ण होत कौतुकास्पद यश प्राप्त केले.
वकिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मैथिलीने एलएलएम अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. मैथिली हिचे वडील निळकंठ बगळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पोलीस निरीक्षक असून मैथिली तिची आई दारिस्ते जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. मैथिलीच्या या यशाबद्दल तिचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.
यावेळी समीर नलावडे यांनी मैथिली बगळे हिचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





