सावंतवाडी भाजपमध्ये धुसफूस! मोहिनी मडगावकरांचा हल्लाबोल

सावंतवाडी भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस उफाळून आली आहे. नगरसेविका आणि भाजपच्या शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षातील कथित गटबाजी, अपमानास्पद वागणूक आणि काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर थेट हल्लाबोल केला आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही सातत्याने अडथळे निर्माण करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, एका पदाधिकाऱ्यामुळे अन्याय सहन करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या राजीनाम्यामुळे सावंतवाडी भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात या राजकीय भूकंपाचे पडसाद किती दूरवर उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





