सुशांत नाईक उपनगराध्यक्ष म्हणून १ वर्षाचा कार्यकाळ देखील पूर्ण करू शकणार नाहीत!

कणकवलीच्या उपनगराध्यक्षाना खासदार राणे ओळखत नाहीत

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा टोला

तुम्ही उपनगराध्यक्ष आहात ही आमदार निलेश राणे यांचीच कृपा

सुशांत नाईक खासदार राणे यांच्या पराभवावर बोलले, खरं तर तुमच्या राजकीय टीका टिप्पनित वैयक्तिक पणे खासदार राणे यांच्यावर बोलण्याचा दुरान्वये संबंध नव्हता. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत खासदार राणे यांनी कणकवली शहरातून एक फेरी मारली असती तरी शहर विकास आघाडी फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिली असती. निकाल काही वेगळाच असला असता हे सुज्ञ कणकवली जाणते. राणे पराभूत झाले म्हणून भाष्य करणारे नाईक स्वतःच्या आणी शहर विकास आघाडीच्या विजयाचा उल्लेख करताना वैभव नाईक यांचा देखील वाटा आहे असा उल्लेख केला. तसच असेल तर स्वतः वैभव नाईक, विनायक राऊत हे देखील पराभूत झाले असताना तुमच्या विजयात त्यांचा वाटा कसा असा असू शकतो? असा सवाल देखील संदीप मेस्त्री यांनी केला आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी खासदार राणे यांचा उल्लेख नाईक यांनी करू नये. फक्त प्रसिद्धीसाठी खासदार राणेंवर टीका करणाऱ्या सुशांत नाईक यांना खासदार राणे ओळखत देखील नाहीत असा टोला युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी लगावला आहे.त्यामुळे थोड्याच दिवसाचे उपनगराध्यक्ष म्हणून आपण कार्यकाळ सांभाळावा,. काम कमी आणि बडबड जास्त अशी परिस्थिती नाईक यांची झाली असून कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष कार्यालय हे राजकीय टिकेचे स्थान बनले असल्याचे कणकवलीकर का म्हणत आहेत याचा विचार नाईक यांनी करावा. खासदार राणे यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे संदीप मेस्त्री म्हणाले.

error: Content is protected !!