रोहन शारबिद्रे यांचा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार

कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी झाली निवड

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी कुडाळ येथील रोहन सदानंद शारबिद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक (राजपत्रित अधिकारी गट- अ) या पदावर रोहन शारबिद्रे याची निवड झाली. या पदासाठी परीक्षा झाली होती. यामध्ये रोहन शारबिद्रे यांनी बारावा क्रमांक पटकावला. ही परीक्षा मुंबई उच्च न्यायालयामार्फत राबविण्यात आली होती. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन विवाह समुपदेशक पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती झाल्यानंतर कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने रोहन शारबिद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, प्रथमेश केळबाईकर तसेच सदानंद शारबिद्रे, सौ. शारबिद्रे, मयूर शारबिद्रे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!