देवगडच्या पर्यटन वृद्धी करिता मिसळ महोत्सव

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन
नाशिक, पुणेरी, कोल्हापुरी सह अन्य मिसळ चे अनेक विविध स्टॉल
देवगड तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. देवगड तालुक्यात पर्यटनवृद्धी व्हावी, याकरिता जे जे काय करता येईल, ते आम्ही करणार आहे.
भाजपच्या माध्यमातून मिसळ महोत्सव आयोजित केला आहे, याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. वैभववाडीतही भाजपतर्फे मिसळ महोत्सव आयोजित केला होता. यातून येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ झाला. देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जे जे शक्य आहे, ते केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या देवगड मधील मिसळ महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मिसळ महोत्सवाकरिता देवगडकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे. आज या मिसळ महोत्सवाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून, यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जि प च्या माजी सभापती सावी लोके, बाळ खडपे, प्रकाश राणे,माजी जि प उपाध्यक्ष सदा ओगले, तन्वी चांदोसकर, आद्या गुमास्ते, प्रणाली माने, प्रियाका साळस्कर, योगेश पाटकर, संतोष किजवडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी