जलतरण एक सर्वांग सुंदर व्यायाम – क्रांती रेडकर

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या जलतरण तलावाचे उदघाटन
जलतरण एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे. शालेय जीवनापासून अशा प्रकारच्या व्यायामाची सोय शाळेमध्ये उपलब्ध करून देऊन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने एक सुंदर आदर्श जिल्ह्यामध्ये घालून दिलेला. आहे. आणि हा जिल्ह्यातील शाळांमधील मुलांसाठी एकमेव उपक्रम असावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक सुंदर पर्यटन दृष्ट्या किनारा लाभलेला आहे. त्यामध्ये जलतरण कौशल्याने युक्त असलेले विद्यार्थी घडणे, त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि भविष्यातील उपजीविकेसाठीसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवाणकर यांनी याची योजना सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूल शाळेच्या परिसरात करून एका दूरदृष्टीचा आदर्श घालून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक अभिनंदन करावे तेवढे थोडेच आणि अशा प्रकारच्या एका शालोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन करण्याची सुसंधी आपणास दिल्याबद्दल त्यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे आभार,धन्यवाद व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे जिल्ह्यातील प्रशालेच्या प्रांगणात उभारलेल्या, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्विमिंग पूलचे भव्य उद्घाटन क्रांती रेडकर यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल आयोजित या विशेष सोहळ्यात शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर श्री. जळवी, सामाजिक कार्यकर्ते गजानन कांदळगावकर, संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, संस्थेच्या व्यवस्थापकिय अधिकारी सौ. पल्लवी कामत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, जलतरणचे मार्गदर्शक वराडकर सर व त्यांचे सहकारी, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. क्रांती रेडकर- वानखेडे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून स्विमिंग पूल सर्वांसाठी खुला करण्यात आला.
जिल्ह्यातील प्रशालेशी संलग्न असा हा एकमेव स्विमिंग पूल असल्याने विद्यार्थ्यांना जलतरणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी व्यक्त केला.
या आधुनिक स्विमिंग पूलमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून, कुडाळच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.





