शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी माझी – वैभव नाईक

दोडामार्ग मध्ये जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे जल्लोषी स्वागत

         शिवसेना हा बाळासाहेबांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. सत्ता येईल सत्ता जाईल परंतु आम्ही शिवसेना पक्षाच्या विचारांशी ठाम राहिलो आहोत. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची आणि तुमच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी माझी आहे. दोडामार्ग मध्ये हत्तींकडून होणारे नुकसान, अवैध खाणकाम हे ज्वलंत प्रश्न आहेत. त्याचबरोबर रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा अशा विविध समस्या जनतेला उद्भवत आहेत. विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आपल्याला आवाज उठवायचा आहे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांनी सांगितले. 
      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी मा. आ. वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल आज दोडामार्ग बाजारपेठ येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवसेना दोडामार्ग तालुका संपर्क कार्यालयात निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिवसेना  जिंदाबाद! वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. 

      याप्रसंगी बाळा गावडे म्हणाले, वैभव नाईक यांनी जिल्हाप्रमुख पदी यापूर्वी धडाडीने काम केले आहे. त्यामुळे त्यावेळी कुडाळमध्ये ते स्वतः आणि सावंतवाडी मध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. संघटनेत नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी उद्धवजींनी पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची नियुक्ती केली आहे आणि वैभव नाईक उद्धवजींच्या विश्वासाला खरे उतरतील असा विश्वास श्री. गावडे यांनी व्यक्त केला. 
       नगरसेवक चंदन गावकर म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणे, कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे काम वैभव नाईक सातत्याने करत आले आहेत. आता त्यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केल्यामुळे नक्कीच जिल्ह्यातील शिवसेना पक्षाला उभारी मिळेल. वैभव नाईक यांच्यासारखे उमदे नेतृत्व लाभल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 
   तालुकाप्रमुख संजय गवस म्हणाले वैभव नाईक यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे. तरुणांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाबुराव धुरी यांनी देखील जिल्हाप्रमुख पदी चांगले काम केले असून आता वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना संघटना अधिक बळकट होईल असा  विश्वास व्यक्त केला. 

      याप्रसंगी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, दोडामार्ग उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हासंघटक विनय जाधव, उपतालुकाप्रमुख संदेश राणे, मिलिंद नाईक, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, महिला तालुकाप्रमुख जेनिफर लोबो, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, अतुल कर्पे, संतोष मोर्ये, भिवा गवस, गणेश धुरी, प्रदीप सावंत, राजू गावडे, संजय सुतार, देवानंद गवस, श्याम खडपकर, शुभम देसाई, प्रकाश कदम, अनंत शेटकर, दिलीप शेर्लेकर, आत्माराम मेस्त्री, प्रमोद टुंबरे, अंकुश आजरेकर, दशरथ मोरजकर, सोमनाथ गवस, दीपक पेडणेकर, सत्यवान नाईक, रामा कासकर, सोमा खोत, रेश्मा शेख, रघुवीर देऊलकर, तानाजी देसाई, सिद्धेश कासार, सूर्यकांत डांगी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
error: Content is protected !!