श्री देव कोळंबा जत्रा ३ मे रोजी उत्साहात साजरी होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव कोळंबा यांच्या जत्रेचे आयोजन रविवार, ३ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा असा श्री देव कोळंबा यांचा महिमा असून, या जत्रेसाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे. जत्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत पूजाविधी होणार असून, सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडेल. दुपारी १२.०० ते ४.०० या वेळेत नवीन नवस बोलण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री देव कोळंबा उत्सव सेवा मंडळ, नांदगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, अध्यक्ष नागेश मोरये यांनी सर्व भाविकांना जत्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!