नवीन उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न
कुडाळ ; सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या उद्योग सेवा विभागातर्फे कुडाळ तालुका व्यापारी संघाच्या वतीने गुरुवार, १३ एप्रिल २०२३ रोजी अनंत मुक्ताई हॉल येथे दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्ग शिबिर संपन्न झाले. यावेळी बँक ऑफ इंडियाचे मेश्राम तसेच जिल्हा उद्योग व्यवस्थापक दामले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, उपाध्यक्ष गोविंद सावंत, अवधूत शिरसाट, राजन नाईक, कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कुडाळ