सावंतवाडीत रंगणार “कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा” धमाका:भव्य फन फेअर,फूड फेस्टिवलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.

कंजूमर स्टॉल,ऑटो एक्स्पो, हॅन्डलुम-हॅंडीक्राफ्ट,ज्वेलरी, सोलर,कॉस्मेटिक,सर्व गृहपयोगी वस्तू महोत्सवाच्या एका छताखाली
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी संपर्क: ९३७०४४०८९३ /८४०८९२९९२३
स्टॉल बुकिंग साठी संपर्क- ९७६९६६८३८५
सावंतवाडी:प्रतिनिधी
कोकणच्या सांस्कृतिक परंपरेला आधुनिकतेची जोड देत,’कोकण नाऊ’ चॅनेलच्या वतीने दि. १७ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य ‘सावंतवाडी पर्यटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. जिमखाना मैदान सावंतवाडी येथे होणाऱ्या या महोत्सवात ‘फूड फेस्टिवल’ आणि ‘फन फेअर’ हे खास आकर्षण असणार आहे.
🔶महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये: या दहा दिवसांच्या महोत्सवात पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना एकाच छताखाली विविध गोष्टींचा आनंद घेता येणार आहे
🔶व्यापारी प्रदर्शन:ऑटोमोबाईल, प्रॉपर्टी,फर्निचर,इंटेरियर, सोलर,लाईफ स्टाईल,कंझ्युमर आणि हँडलूम हँडीक्राफ्टचे विविध स्टॉल्स उपलब्ध असतील
🔶सांस्कृतिक मेजवाणी आणि मनोरंजन: वेशभूषा स्पर्धा,डबलबरी भजन,खेळ पैठणीचा,फुगडी जुगलबंदी, लावणी स्पर्धा,एकेरी नृत्य स्पर्धा,दशावतारी नाटक,भव्य फॅशन शो, डान्स शो अश्या विविध संस्कृतील कार्यक्रमांच आयोजन यां महोत्सवादरम्यान करण्यात आले आहे.
🔶धमाल मस्ती आणि बरंच काही..!-
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी येथे मनोरंजनाचे साधन उपलब्ध आहे.चविष्ट पदार्थांची रेलचेल असलेला ‘फूड फेस्टिवल’ आणि मुलांसाठी विविध उंच पाळणे व खेळांचे ‘फन फेअर’ हे या महोत्सवाचे मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहेत.
✅ स्टॉल बुकिंग साठी संपर्क आणि नोंदणी: ९७६९६६८३८५
✅सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागासाठी संपर्क: ९३७०४४०८९३ / ८४०८९२९९२३
ठिकाण: जिमखाना मैदान, सावंतवाडी.
कालावधी: १७ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६.
🎬सावंतवाडीकरांच्या हक्काचा सांस्कृतिक महोत्सव – सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन कोकण नाऊ चॅनेल तर्फे करण्यात येत आहे.





