कुडाळ देशकर ज्ञातीचा जिल्हास्तरीय महिला मेळावा

यावर्षी कणकवली तालुक्याला बहुमान

सखी विहार या टॅगलाईन खाली होणार भव्य दिव्य मेळावा

कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाजातर्फे ज्ञाती महिलांचा वार्षिक स्नेहमेळावा रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी फोंडाघाट येथे पूर्णानंद भवन येथे आयोजित केला आहे. सदर मेळाव्याचे हे सलग सातवे वर्ष असून यावर्षी हा मान प्रथमच कणकवली तालुक्याला मिळाला असून कणकवली येथील पूर्णानंद महिला मंच यांनी या जिल्हा मेळाव्याच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले आहे.
सदर मेळाव्यास संपूर्ण जिल्हाभरातून महिला उपस्थित राहणार असून मान्यवर म्हणून रत्नागिरीचे लोकप्रिय आमदार बंधु उदय आणि भैय्या सामंत यांच्या मातोश्री आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव, व्यावसायिक श्री. आर. डी. उर्फ अण्णा सामंत यांच्या पत्नी सौ. स्वरूपा सामंत, गोवा येथील झायडस फार्मा या नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या महाप्रबंधक वर्षा हवालदार, गोव्यातील नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या डॉ. शिल्पा सामंत अशासारख्या कर्तबगार महिला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाभरातून उद्योजक महिला आपापली उत्पादने विक्रीसाठी आणणार असून त्या प्रत्येकीला स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक भगिनींचा यथोचित सत्कार केलं जाणार असून इतर गृहीणीना व्यावसायिक होण्यास प्रोत्साहन मिळावे हा मुख्य हेतु आहे. या मेळाव्यास सर्व जिल्हाभरातून कुडाळ देशकर ज्ञाती महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!