ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कुडाळात शिवसेना, महाविकास आघाडी आक्रमक

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची राष्ट्रपतींकडे केली मागणी

मा. आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ प्रांताधिकाऱ्यांकडे मागणीचे दिले निवेदन

       निवडणूक आयोगातील अनेक महत्त्वाचे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेऊन  भारत देशाशी गद्दारी  केल्याप्रकरणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात 'वोटचोरी' करून झालेल्या निवडणुका रद्द करून त्या पुन्हा घेण्यात याव्यात अशी मागणी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीने भारत देशाच्या राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू  यांच्याकडे निवदेनाद्वारे केली असून हे निवदेन आज कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख  उपस्थितीत कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे सुपूर्द करून ते राष्ट्रपतींकडे पाठविण्यास सांगण्यात आले. 

       याप्रसंगी निवडणुकीत गैरव्यवहार करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.'वोटचोरी' करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ज्ञानेश कुमार हटाव देश बचाव, अशा घोषणा देत देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रातील सत्ताधारी खासदार, सत्ताधारी आमदार हे स्वतः ज्ञानेश कुमारच असल्याचे उपरोधक  घोषणाबाजीतून जाहीर करण्यात आले. 

      यावेळी मा. आ. वैभव नाईक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात २० हजार मतदान वाढले होते. एस. आय.आर. अभियानात अनेक मतदारांची नावे वगळली आहे. काही मतदारांच्या त्रुटी काढण्यात आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जेवढे मतदान झाले तेवढे एस.आय.आर. अभियानात मतदार सापडले नाहीत. त्यावरून वाढीव मतदानावर शंका उपस्थित होत आहेत.  इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. संधू आणि डॉ. जोशी यांनीही निवडणूक आयोगाच्या कामकाजात गैरव्यवहार झाला असल्याबाबत आक्षेप घेतले आहेत.त्यासंदर्भात ४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधू जनमोर्चा काढणार आहेत. लोकांमध्ये या घोटाळ्याबाबत जागृती व्हावी यासाठी शांततेच्या मार्गाने  आम्ही हे निवेदन देत आहोत. हे निवेदन आणि आमच्या भावना आपण राष्ट्रपतींकडे पोहचवाव्यात असे वैभव नाईक यांनी  कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना सांगितले. 

      देशाच्या राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू  यांना लिहिलेल्या निविदेनात म्हटले आहे कि, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४ वेळा लिखित आक्षेप नोंदवले आहेत.  निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था असून तिचे निर्णय बहुमताने किंवा एकमताने घेणे बंधनकारक असते. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन आयुक्तांच्या विरोधाकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक महत्त्वाचे निर्णय 'एकतर्फी' आणि चुकीच्या पद्धतीने घेतले आहेत.  ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा गळा घोटून भारत देशाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात 'वोटचोरी' करून झालेल्या निवडणुका रद्द करून त्या पुन्हा घेण्यात याव्यात अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीची ठाम मागणी आहे.त्याबाबत योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे. 
         याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,राजन नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, बाळा कनयाळकर, श्री.जैतापकर, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळा पावसकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट,  जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगे, अवधूत मालणकर,पप्पू म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, एकनाथ धुरी, ममता राऊळ, दीपक धुरी,दीपक आंगणे,सागर भोगटे,बाळू पालव, सचिन ठाकूर,प्रविण पालव,अमित राणे, संदीप म्हाडेश्वर,गुरु गडकर, राजेश टंगसाळी,अशपाक कुडाळकर,नितीन सावंत, मंगेश बांदेकर, शैलेश काळप, राहुल सावंत,उपसरपंच लक्ष्मण तेली, उपसरपंच बापू बागवे,सचिन भिसे, यज्ञेश गोडे,राजू घाडीगावकर, महेश वेळकर, एम.बी. गावडे, कुणाल किनळेकर,उमेश घाटकर,दत्ताराम गावडे, श्री. वरक, आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!