खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे सामाजिक उपक्रम

खारेपाटण भाजपा विभाग व सामाजिक कार्यकर्ते, राणे समर्थक रफिक नाईक मित्रमंडळ यांचे आयोजन
खासदार.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी (७५ व्या) वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील खारेपाटण भाजपा विभाग व सामाजिक कार्यकर्ते, राणे समर्थक रफिक नाईक मित्रमंडळ यांनी आयोजन केले असून आज १० एप्रिल रोजी खारेपाटण आणि परिसरातील १० शाळांमधील ५५० विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.यामध्ये खारेपाटण केंद्रशाळा, खारेपाटण बंदरगा उर्दू शाळा, काजिर्डे उर्दू शाळा आणि नडगिवे, वारगाव, शिडवणे यांसारख्या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.





