खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वागदे सरपंचांचा स्तुत्य उपक्रम

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भासणारी टंचाई पदरमोड करत केली दूर
वागदे ग्रामपंचायत व सरपंच यांच्या माध्यमातून वागदेतील त्या ग्रामस्थांना मिळाले बोरवेलचे पाणी
माजी मुख्यमंत्री मंत्री तथा खासदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वागदे गोपुरी वसाहत येथे वागदे ग्रामपंचायत व सरपंच संदीप सावंत यांच्या माध्यमातून या भागातील असलेल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून तात्काळ विंधन विहीर (बोअरवेल) खोदाई करून देण्यात आली. गेली 10 वर्षा पासून या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यात हाल होत होते. एप्रिल मे मध्ये विहिरी मधील पाणी संपत होते. त्यामुळे सरपंच संदीप सावंत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत व सरपंच सावंत यांनी स्वतः पदरमोड करून नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. नारायण राणे यांचा वाढदिवस अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा केल्याबद्दल ग्रामस्थांमधून देखील संदीप सावंत यांचे कौतुक केले जात आहेत. यावेळी बाळू मोरे, प्रकाश आरोलकर, कांबळे, गुरु टेंडरकर रमाकांत आरोलकर, शशी आरोलकर श्री. डीकवलकर, श्रीधर घाडीगावकर आधी उपस्थित होते.





