प्राजक्त चव्हाण यांना विधी शाखेची पदवी

क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेकडून अभिनंदन
क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळचे सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांना मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेची (L.L.B) पदवी प्राप्त झाली.
कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज मधून मुंबई विद्यापीठची पदवी प्राप्त केल्याबद्दल क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मुमताज शेख मॅडम यांनी पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव केला व त्यांना पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील सर्व शिक्षकांनी चव्हाण सर यांचे अभिनंदन केल.
पहिल्यापासून शिक्षणाची व समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कष्टकरी कामगार वर्गासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. या पदवीचा उपयोग कष्टकरी, कामगार वर्ग या लोकांच्या जनकल्याणासाठी करणार आहेत. सध्या ते श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याच कामाची दखल म्हणून शिवसेना पक्षाकडून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे अनुसूचित जाती प्रमुख म्हणून आमदार निलेश राणे साहेब व जिल्हा प्रमुख दत्ता सामंत साहेब यांनी त्यांची निवड केली.
त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या शिक्षण क्षेत्रात, कष्टकरी कामगार क्षेत्रात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख मॅडम यांचे वेळोवेळी त्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.






