राजे श्रीमंत बाळराजे लखनराजे व राणी शुभादेवी यांची भेट
कुडाळ ; कराची शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम नामांतरण कार्यक्रमास कुडाळ शहरवासीय व विद्यार्थी पालकांच्या वतीने विरोध झाला. या आंदोलनास सावंतवाडी संस्थानच्या राजे घराण्याने या आंदोलानास संपूर्ण पाठिंबा दिल्यानंतर या आंदोलनाला धार आली. त्यामुळे आंदोलन यशस्वीतेकडे वळले. त्यानंतर मुजोर कमिटीला नाव खाली उतरावे लागले. याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुडाळ इंग्लिश मीडियम संघर्ष समितीच्या वतीने सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बाळराजे लखनराजे व राणी शुभादेवी यांची भेट घेण्यात आली. आपल्या सहकार्यामुळे हे आंदोलन यशस्वीतेकडे जाऊ शकले याची कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राजांनी दिलखुलास गप्पा करून सावंतवाडी संस्थानचे कुडाळ ही राजधानी होणार होती. राजे जयरामराजे व कुडाळ शहरातील अन्य गोष्टींची दिलखुलास चर्चा करून भविष्यात कुडाळ तालुक्यात आणि शहरातील सर्व जडणघडणीमध्ये आपला सहभाग असेल असे आश्वासन दिले. यावेळी अभय शिरसाट, धीरज परब, ओंकार तेली, रत्नाकर प्रभू, सिद्धेश नाईक, संदेश पडते, बंड्या शिरसाट, शैलेश घोगळे उपस्थित होते.
प्रतिनिधी, कुडाळ