बँक ऑफ इंडियाच्या मयत खातेदाराच्या वारसांना विमा रक्कम प्रदान

बचत खात्याच्या सामूहिक बचत विमा कवचाचाही लाभ
बँक ऑफ इंडिया झाराप शाखेचे खातेदार प्रताप कुडाळकर यांचे गणेश चतुर्थी कालावधीत विजेच्या धक्क्याने अपघाती निधन झाले होते. त्यांच्या खात्याला प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा विमा उतरविला असल्याने त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपयेचा विमा मिळाला. तसेच त्यांच्या बचत खात्यावर तिमाही सरासरी शिल्लक ही दहा हजार रुपयेच्या वरती असल्याने त्यांना बँक ऑफ इंडिया मार्फत बचत खात्याला असलेले सामूहिक विमा संरक्षण कवच प्राप्त झाले व त्यामधून त्यांना पंचवीस लाख रुपये चा विमा रक्कम ही बँक ऑफ इंडिया मार्फत त्यांच्या वारसदारांना देण्यात आली.
बँक ऑफ इंडिया झाराप शाखेने ही सामाजिक बांधिलकी जोपासून केलेल्या कामाबाबत कुडाळकर कुटुंबियांनी आभार मानले
बँकेच्या खातेदाराच्या अपघाती किंवा इतर आकस्मिक निधनानंतर त्यांच्या वारसांना मिळणारी रक्कम ही देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बँक ऑफ इंडिया झाराप शाखेने करून सामाजिकतेचे एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.पावसाळ्यात गणेश चतुर्थी कालावधीत ऑगस्ट 2025 मध्ये विजेच्या धक्क्याने झाराप येथील शेतकरी प्रताप कुडाळकर यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या खात्याला प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना चा विमा उतरविला असल्याने त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपये चा विमा मिळाला तसेच 25 लाखाचे विमा संरक्षण कवच मिळाले बुधवारी बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले यावेळी प्रमुख, राजभाषा विभाग रमेश गायकवाड गावडे, आरसेटी संचालक किशोर रोडी, शाखा व्यवस्थापक शरथ एस, प्रशासकीय प्रभारी गुरप्रीत सिंग, एलडीएम अधिकारी राकेश कुंभारे, अधिकारी नीरजा के, रोखपाल मालोजी कवाडे, लिपिक कर्मचारी पृथ्वी राज प्रधान, उप-कर्मचारी शंकर अंकुश, रोजंदारी कर्मचारी सौ. शितल बिडये झाराप गावचे माजी उपसरपंच अजित मांजरेकर श्रीमती प्रतिभा कुडाळकर, प्रसन्न कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री देवरे म्हणाले बँक ऑफ इंडिया ही सामाजिक भान ठेवून ग्राहकाचे जे प्रश्न आहे ते सोडविण्यासाठी कार्यरत असते. अनेक प्रश्न सोडवितानाच या ठिकाणी ऑगस्ट 2025 मध्ये गणेश चतुर्थी मध्ये बँकेचे ग्राहक प्रताप कुडाळकर यांचे विजेच्या धक्क्याने दुःखद निधन झाले होते. त्यांनी या बँकेत आपली रक्कम ठेवली होती त्या रकमेतून त्यांच्या कुटुंबाला 25 लाखाचा धनादेश आज वितरित झाला आहे. ग्राहकांनी सुद्धा भविष्यात लक्ष केंद्रित करून आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याचं काम अशा प्रकारे बँकेत ठेवी ठेवून करावे. आज कुडाळकर यांच्या ठेवीमुळे त्यांच्या कुटुंबाला अशा ठेवीमुळे आर्थिक भक्कम आधार मिळाला. खात्याला वारसदार नोंद असल्याने त्यांच्या वारसदारांना ही रक्कम मिळण्यास कुठलीही अडचण आली नाही. भविष्यात ग्राहकांनी आपण ठेवलेल्या ठेवीबाबत सतर्क राहिले पाहिजे कोणत्याही अमिषाला बळी पडू नका अधिक माहितीसाठी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी या कुडाळकर कुटुंबाला बँकेच्या सर्व अधिकारी यांच्याबरोबरच त्यांना दोन्ही विमा मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय काम करणारे प्रशासकीय प्रभारी गुरप्रीत सिंग यांचे भेटवस्तू देऊन श्री. देवरे यांनी अभिनंदन केले.





