गावराई जलजीवन मिशन व जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर विकासकामांचे निलेश राणे यांच्या उपस्थित भूमिपूजन

गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत विकासकामांचा शुभारंभ
कुडाळ : तालुक्यातील गावराई येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अभियान अंतर्गत मंजूर नळपाणी योजनेचा व जिल्हा वार्षिक योजना तसेच राज्य अर्थसंकल्प अंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावराई येथे पार पडला यावेळी श्रीफळ वाढविण्याचा मान गावच्या लोकनियुक्त सरपंच सोनल शिरोडकर यांना दिला. यावेळी श्री देव गिरोबा मंदिर येथे बोलताना गावराई गावाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही याची हमी दिली. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, माजी सभापती अंकुश जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, सरचिटणीस देवेंद्र सामंत, ओरोस मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सुप्रिया वालावलकर आदी उपस्थिती होते.
प्रतिनिधी, कुडाळ