कणकवली रोटरी क्लब ला राजू गवाणकर यांच्याकडून रुग्ण बेड सुपूर्द

गरजू रुग्णांकरिता दात्यानी साहित्य रोटरी क्लबला देण्याचे आवाहन
रोटरी क्लब कडून समाधान व्यक्त
कणकवली रोटरी क्लब ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ हर्षल उर्फ राजू गवाणकर यांच्याकडून अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असा रुग्ण बेड प्रदान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, हर्षल उर्फ राजू गवाणकर, अध्यक्ष वर्षा बांदेकर, नगरसेविका मेघा गांगण, दीपक बेलवलकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, माधवी मुरकर, महेंद्र मुरकर, दीपक अंधारी, दादा कुडतरकर, गुरुनाथ पावसकर, नितीन बांदेकर आदी उपस्थित होते. कणकवली रोटरी क्लब च्या वतीने यावेळी श्री. गवाणकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रुग्णांना आवश्यक असणारे साहित्य दात्यांनी कणकवली रोटरी क्लब ला द्यावे जेणेकरून या साहित्याचा रुग्णांना आजारपणाच्या वेळी मोफत उपयोग करता येऊ शकतो. कणकवलीत रोटरी क्लब हे साहित्य पूर्णपणे मोफत रुग्णांना उपचारापर्यंत पुरवठा करते असेही यावेळी बांदेकर यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर/ कणकवली