खारेपाटण पंचशील नगर येथील रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय वस्तीतील अनुसूचित जाती/जमाती घटकांचा विकास करण्याच्या उद्देशाने दलीत वस्ती सुधार योजनेतून खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण पं.स.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी खारेपाटण जि.प. सदस्य सौ प्राची ईसवलकर,सरपंच श्री महेंद्र गुरव,माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,ग्रा.पं.सदस्य श्री सुधाकर ढेकणे,श्री किरण कर्ले,श्री जयदीप देसाई,सौ शीतीजा धुमाळे, मनाली होणाळे,श्री प्रणय गुरसाळे, शिवसेना कार्यकर्ते श्री मंगेश ब्रम्हदंडे,श्री सुहास राऊत, पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,सचिव – सागर पोमेडकर,पंचशील नगर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री मधुकर पाटणकर,श्री अशोक पाटणकर युवा कार्यकर्ते श्री मकरंद पाटणकर आसंदीप पाटणकर तसेच ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर ग्रामपंचायत लिपिक श्री अनिकेत गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण पंचशील नगर येथील रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी सुमारे ३ लाख रुपये मंजूर असून खारेपाटण ग्रामपंचायत ने या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न केल्याबद्दल माजी सरपंच प्राची ईसवलकर व विद्यमान सरपंच श्री महेंद्र गुरव यांचे खारेपाटण पंचशील नगर ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आलेआहे

error: Content is protected !!