माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे विविध कार्यक्रम

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार 25 मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आचरा विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप, संध्याकाळी आठ वाजता आचरा विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, चिंदर गावातील प्रथितयश व्यक्ती आणि बारा पाच मानक-यांचा सत्कार, रात्री साडेआठ वाजता माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस समारंभ, रात्री नऊ वाजता ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर पुरस्कृत चिंदर सातेरी मंदिर नजिक कलेश्वर नाट्य मंडळ नेरुर यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभाग प्रमुख समिर लब्दे यांनी केले आहे.




