ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 55 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम

आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 55 कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी पिरावाडी पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी ग्राप सदस्य सौ. पूर्वा तारी यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. कासव संवर्धनाची अनोखी परंपरा कासवमित्र सुर्यकांत धुरी यांनी कायम सुरु ठेवली आहे. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल तन्वी माणगावकर प्रज्ञा गावकर होमगार्ड विनय घाडीगावकर ग्रामस्थ अरुण नावगे नंदा नावगे तसेच पर्यटक उपस्थित होते.
यावेळी पिरावाडी कासव मित्र तथा बीच मॅनेजर सूर्यकांत धुरी यांनी सांगितले की चालू हंगामात आतापर्यंत 100 कासव पिल्ले समुद्रात सोडली असून आचरा बीचला विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी कासव जास्त पसंती देत आहेत. आचरा समुद्रकिनारा त्यांना सुरक्षित वाटत आहे ही बाब अत्यंत आनंदाची असूनआपण त्यांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

error: Content is protected !!