ग्रामपंचायत पोंभुर्ले येथे २५ मार्च रोजी समाधान शिबिर

महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर शासन निर्णयानुसार मंडळ कार्यालय पाटगाव अंतर्गत येणारे शेतकरी जनता नागरिक यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांची संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे जनजागृती करून अंमलबजावणी करणे व सेवा पुरविणे या उद्देशाने
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वअभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात पोंभूर्ले येथे बुधवार २५मार्च रोजी सकाळी १०वाजता समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रलंबित फेरफार, सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी चे सातबारा आणि आठ अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ,अकृषीक परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन आणि सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय योजनांची लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप तुकडे बंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा पानंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, घरासाठी पट्टेवाटप ई मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅग आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तरे अद्ययावत केली जाणार
आदी सेवा या अभियानांतर्गत दिल्या जाणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देवगड तहसीलदार आर जे पवार, पाटगाव मंडल अधिकारी चिंतामण भोये यांनी केले आहे.




