शहर स्वच्छतेसाठी कणकवलीच्या भाजपाच्या नगरसेविका सरसावल्या

कणकवली शहरात राबवली स्वच्छता मोहीम

स्वच्छ परिसर सुंदर परिसर हे ब्रीद वाक्य घेऊन नगरसेविका मेघा गांगण वार्ड क्रमांक ५ मधील नागरिक आणि साज गृपच्या महिलांना घेऊन विद्यानगरमध्ये साफसफाईसाठी उतरल्या.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कणकवली शहर स्वच्छ करावे अशी मागणी लोकांमधून होत होती.‌ आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, सुप्रिया नलावडे आणि मेघा गांगण या सर्वांनीच आपापल्या हातात झाडू घेत कचरा निर्मुलनासाठी कंबर कसली.
विद्यानगरमध्ये साफसफाई करताना कॉलेज रोड परिसरात अनावश्यक जाहिराती बॅनरच्या माध्यमातून लावलेली दिसते.‌ तसेच सकाळच्या वेळेत घंटागाडी आल्या तरी काही नागरिक रात्रीच आपला कचरा उघड्यावर टाकताना दिसतात.
ज्याठिकाणी हा कचरा दिसत आहे तिथे कचरा प्रतिबंधक बोर्ड लावण्याच्या सुचना आणि अनावश्यक जाहिरातीचे बॅनर काढून काढण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आली.
नागरीकांना आव्हान करण्यात येते की जसे घर स्वच्छ ठेवता त्याप्रमाणे आपला रस्ता आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
घरातील कचरा जर कोणी रस्त्यावर टाकत असेल तर त्यांचा फोटो काढा आणि एक हजार रुपये बक्षिस नगरसेविका मेघा गांगण यांच्याकडून घेऊन जा.
हि स्वच्छता मोहीम सातत्याने करण्यात येईल फक्त नागरिकांनी देखील आपले योगदान द्यावे असे आवाहन नगरसेविका मेघा गांगण यांनी केले.
यावेळी रहिवासी गंगाधर सावंत, संदीप पारकर, संतोष कांबळे, अजय गांगण, तृप्ती कांबळे, आस्मा बागवान, वीणा राणे, राजू बागवान, यश खानोलकर, सोम गांगण, तुषार मोर्ये, विशाल होडावडेकर आणि नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!