नेतृत्व जे यश घडवतं…आणि यश जे प्रेरणा देतं…!”

आज आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहोत एक अशा व्यक्तिमत्त्वाला, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मा. श्री. संजयजी घोडावत — एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, आणि हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे मार्गदर्शक.संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर इंजिनिअरिंग, कॉमर्स, मॅनेजमेंट, डिझाईन, फार्मास्युटिकल सायन्स, लाइफ सायन्स, सोशल सायन्स, मीडिया आणि लॉ अशा विविध शाखांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. फक्त शिक्षणच नाही, तर इंटरनॅशनल स्कूल, आय.आय.टी. व मेडिकल अकॅडमी, ऑलिंपियाड स्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि इन्स्टिट्यूट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे. उद्योग क्षेत्रातही एव्हिएशन, कंझ्युमर प्रॉडक्ट्स, टेक्सटाइल्स, रिटेल, रिअल इस्टेट आणि एनर्जी या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत रोजगारनिर्मिती आणि विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांचे नेतृत्व असेच यशस्वी राहो, त्यांची प्रेरणा नव्या पिढीला दिशा देत राहो, आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांचे कार्य अधिकाधिक बहरत राहो —हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, संजयजी घोडावत साहेब!

error: Content is protected !!