पाट हायस्कूल हरितसेनेमार्फत वृक्षाला रक्षाबंधन

पाट हायस्कुल मध्ये आज रक्षा बंधन सणाचे औचित्य साधून हरित सेनेच्या वतीने वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. वृक्षांचे जतन आणि संरक्षण करण्याचे अभिवाचन या कृतीतून हरितसेनेच्या वतीने देण्यात आले.
पर्यावरण रक्षणासाठी पाट हायस्कूल हरितसेने मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. वृक्ष लागवड .वृक्ष संगोपन. विविध पर्यावरण दिन विद्यालयात साजरे केले जातात. या उपक्रमातून मुलांचे निसर्गा विषयीचे प्रेम वाढीस लागते. रक्षाबंधनाच्या दिवशी झाडास राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, संस्था प्रतिनिधी दीपक पाटकर, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, हरित सेना प्रमुख संदीप साळसकर, सर्व विद्यार्थी आणि इतर शिक्षक उपस्थित होते .
मुलांना नियमित पर्यावरण विषयक उपक्रमामध्ये सहभाग घेण्याचे सुचविण्यात येते. तसेच पर्यावरणासाठी या आजच्या झाडासाठी रक्षाबंधनाचे महत्त्व हे सांगण्यात आले. या विविध पर्यावरण विषयक उपक्रमासाठी विविध गट पाट हायस्कूल मध्ये तयार करण्यात आलेले आहेत. या उपक्रमाचे संस्थेकडून कौतुक करण्यात आले.






