आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी थोर कथाकार कवी आणि नाटककार वि.वा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी अगदी सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेला एक उच्च स्थान प्राप्त करून दिलं राज्यभाषेचा दर्जा मिळवून दिला आणि याच मराठी भाषिक लोकांचं प्रमाण हे अधिकाधिक वाढत होतं तर ह्याच मराठी भाषेचा गौरव करण्याचा दिवस अर्थातच मराठी भाषा गौरव दिन या पार्श्वभूमीवर आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्यावर माहिती सांगितली त्याचप्रमाणे मराठी भाषेचा गौरव करणार गौरवगीत सुद्धा सादर करण्यात आले या भाषेची महती सांगणारा नृत्याविष्कार आयडियलच्या विद्यार्थ्यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा उद्देश मराठी भाषेला अधिकाधिक दर्जा प्राप्त करून देणे कारण अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे या मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे आपल्या मायबोली जतन करणे हा याच्यामागचा खरा उद्देश आहे याच अनुषंगाने हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्सच्या वरवडे च्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे सर, उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर सर,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

error: Content is protected !!