कणकवली पोलीस स्टेशन चा दूरध्वनी “आऊट ऑफ ऑर्डर”

गेले काही दिवस दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने जनतेला होतोय त्रास
कणकवली पोलीस स्टेशन चा दूरध्वनी क्रमांक गेले काही दिवस “आऊट ऑफ ऑर्डर” असल्याचे सांगितले जात असून देखील अद्याप हा दूरध्वनी सुरू झालेला नाही. 02367232033 हा दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने जनतेला थेट पोलीस स्टेशनशी संपर्क करणे सध्या अडचणीचे ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती कणकवली हे शहर असताना या शहराला राजकीय सामाजिक व अन्य अनेक दृष्टीने महत्त्व आहे. पालकमंत्री नितेश राणे देखील याच मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांचा ओम गणेश निवासस्थान देखील याच शहरामध्ये येते. व त्या तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारी असलेल्या पोलिस स्टेशनचा दूरध्वनी गेले काही दिवस बंद असूनही तो सुरु होत नसल्याने याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.





