दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने तीवरे ग्रामपंचायत समोर पुन्हा उपोषण सुरू

खाजगी जमिनीतून थ्री फेज लाईन नेल्याचा आक्षेप
तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेल्याप्रकरणी तेथील जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी यापूर्वी स्थगित केलेले आमरण उपोषण आज शुक्रवारी पासून पुन्हा सुरू करण्यात आले. यापूर्वी उपोषण केले त्यावेळी ग्रामपंचायत ने याबाबत श्री म्हाडेश्वर यांना पत्रव्यवहार करत सदर पोल बाबत गटविकास अधिकारी स्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे., त्यानंतर संबंधित विभागांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली 27 फेब्रुवारी पर्यंत सदर लाईन अन्यत्र वळती करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. असे पत्र सरपंच तीवरे यांनी उपोषण कर्त्याना दिले. त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांच्यासहित माजी सरपंच भाई आंबेलकर व अन्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आले. तसेच दिलेल्या कालावधीत सदर काम मार्गी न लागल्यास पुन्हा उपोषण छेडले जाईल असा इशारा देखील श्री महाडेश्वर यांनी दिला होता. त्यानुसार आज हे उपोषण तिवरे ग्रामपंचायत च्या समोर सुरू करण्यात आले आहे.





