एनएमएमएस परीक्षेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या चार पैकी तीन विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले .उत्तिर्ण विद्यार्थी अमोल मालपेकर, आर्या जोशी, किरणं सावंत या यशस्वी विद्यार्थ्यां चे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य,शालेय समिती चे पदाधिकारी सदस्य तसेच मुख्याध्यापक , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.





