करूळ गावाने यापूर्वी भाजपाची पर्यायाने राणेंची नेहमीच साथ दिली!

भाजपाच्या जिल्हा परिषद चे उमेदवार मनोज रावराणे व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
करूळ मध्ये प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद
हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघाने यापूर्वी भाजपाचा पर्यायाने राणेंचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख केली आहे. करूळ गाव हा देखील आतापर्यंत राणेंच्या पर्यायाने भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील माझ्यासहित पंचायत समितीचे भाजपाचे सर्वच उमेदवार मतदार विजयी करतील. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना मी जनतेच्या हिताच्या दृष्टीने कामे करण्यावर भर देणार असून, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल अशी ग्वाही हरकुल बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांनी दिली. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांना देखील विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. तालुक्यातील करूळ मध्ये श्री देव रामेश्वर चे दर्शन घेत करूळ मध्ये भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सौ. समृद्धी संजय नर, उपसरपंच पुरुषोत्तम तानवडे, माजी सरपंच- बबन कर्णिक,मंगेश कर्णिक,अनंत तानवडे,महेश शिंदे,रवींद्र कुडतरकर,बाळा फोपे,विनायक गोमने,ग्रामपंचायत सदस्य – ढवण,राजू शिंदे,सुदर्शन फोपे,जितेंद्र दळवी,दिलीप सावंत,योगेश सावंत व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.





