कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडीचा राणे फॅक्टर शेवटच्या दिवशी देखील “फॉर्मात”

सकाळपासूनच उमेदवारी मागे घेण्याचा सपाटा सुरू
हरकुळ, फोंडाघाट मतदारसंघात बंडखोरी केलेल्या संतोष कानडे यांची देखील माघार
सायंकाळी 3 वाजल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार
कणकवली मतदार संघामध्ये आतापर्यंत भाजपाच्या 10 जागा या बिनविरोध झाल्या होत्या. आता पुन्हा आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कणकवली मध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या माघारीची रीघ लागली आहे. तर बंडखोरी केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील आपली उमेदवारी मागे घेतली जात आहे. यामध्ये हरकुळ व फोंडाघाट जि. प. मतदार संघामध्ये बंडखोरी केलेल्या भाजपाच्या संतोष कानडे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे. सकाळच्या सत्रात धनश्री मेस्त्री यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने भाजपाच्या नांदगाव पंचायत समितीची उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध झाल्या आहेत. सकाळच्या सत्रा पासूनच कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी असून, उमेदवार माघारीचा सपाटा ठाकरे सेनेचा जास्त असल्यामुळे भाजपच्या व शिवसेनेच्या बहुतांशी जागा या बिनविरोध होण्याची शक्यता आहे.





