राजू सदडेकर यांना मातृशोक

रुक्मिणी सदडेकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील साकेडी वरचीवाडी येथील रहिवासी रुक्मिणी विठ्ठल सदडेकर (95) यांचे आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज 11.30 वाजण्याच्या सुमारास साकेडी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साकेडी येथील भाजपाचे जुने कार्यकर्ते, साकेडी सोसायटीचे संचालक व माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रिक्षाव्यवसायिक राजू सदडेकर यांची ती आई होय.

error: Content is protected !!