चाफेखोल येथील उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील उबाठा पदाधिकारी यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश करते गोविंद घाडिगावकर यांना उपविभाग प्रमुख तसेच अन्य प्रवेश करते शशिकांत घाडीगांवकर, रविकांत गोसावी, मयूरी घाडीगांवकर, मिलिंद जाधव यांना पदाधिकारी नियुक्त्या देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे शिवसेना उमेदवार सौ. सुमेधा पाताडे, पंचायत समिती उमेदवार सौ. प्रज्ञा चव्हाण यासह अनिल कांदळकर, राजू प्रभू देसाई, पंकज वर्दम, भाऊ चव्हाण, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, किरण प्रभू, दया प्रभुदेसाई, अल्पेश निकम, शरद पारकर, कमलाकर पारकर, मारुती थोरवंशी, यास अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





