वात्सल्य ट्रस्ट मुंबई चे संचालक मा. श्री. विद्याधर साठे यांची श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा- नर्सिंग कॉलेज, खारेपाटण ला सदिच्छा भेट

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा- नर्सिंग कॉलेज येथे मुंबई येथील वात्सल्य ट्रस्ट चे संचालक श्री.विद्याधर साठे, प्रतिनिधी माधवी मुंडे, आणि मानसी मिठबावकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. खारेपाटण पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमीच खारेपाटण संस्थेमार्फत केला जातो. याचाच एक भाग म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून श्रीमती आशा राजाराम कांबळे पॅरा- नर्सिंग अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेने नवीन पाऊल उचलले आहे.
या अभ्यासक्रमासाठी पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याची दखल घेऊन मुंबई येथील वास्तव्य ट्रस्ट चे संचालक व त्यांचे सहकारी यांना कॉलेजला भेट दिली. आरोग्य क्षेत्रातील विविध संधी व कामाचे स्वरूप याबाबतचे मार्गदर्शन मान्यवरांकडून उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल आणि कॉलेजच्या उत्तम नियोजनाबद्दल ट्रस्टने कॉलेज प्रशासनाचे विशेष कौतुक केले. या नवीन अभ्यासक्रमामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळून त्यांना स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे. वात्सल्य ट्रस्ट चे संचालक श्री. विद्याधर साठे यांनी संस्थेच्या या कार्यासाठी पूर्ण सहकार्य व मदतीचे आश्वासन याप्रसंगी दिले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोसलकर सर्व विश्वस्त प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, आशा राजाराम कावळे पॅरा- नर्सिंग कॉलेजच्या प्रमुख कार्यवाहक श्रीमती सारिका महिंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.





