शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांची जयंती उत्साहात साजरी

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण, येथे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर व त्यांच्या पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या हस्ते गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे सचिव श्री. महेश कोळसुलकर, विश्वस्त श्री. विजय देसाई, श्री. योगेश गोडवे श्री. प्रशांत गुळेकर, श्री. ए. डी. कांबळे, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत व शिक्षक वर्ग यांनी सरांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या वेळी श्री. श्रीकृष्ण पाटणकर यांनी आपल्या भाषणातून गुरुवर्य पेंढारकर सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्कारक्षम कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे असून आजच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंती चे औचित्य साधून सिनिअर कॉलेज विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुपार सत्रामध्ये प्रशालेतील प्राथमिक विभागातील मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!