पोईप हायस्कूल मधील सन २००६-२००७ च्या इ. १० वी अ या वर्गाकडून लोखंडी कंपाऊंड गेट दिला बाधुन

प्रशाला व संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांनचे अभिनंदन व कौतुक होत आहे

पोईप सर्कल एज्यूकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयीन पोईप – विरण या प्रशालेने विद्यार्थ्यांवर संस्कार करून अनेक पिढ्या घडवल्या आहेत. आज प्रशालेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
ज्या शाळेने ज्ञान व संस्कार दिले त्या शाळेला माजी विद्यार्थी विसरले नाहीत. आपल्या शाळेच्या गरजा ओळखून अनेक माजी विद्यार्थी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत.
सन २००६-२००७ च्या इ. १० वी अ च्या वर्गात शिकत असलेल्या सिताराम परब, स्वप्नील पुजारे, स्मिता पारकर, प्रताप माधव, विजय गोसावी, प्रणाली नार्वेकर, मृणाली घाडीगांवकर, वैभव सावंत, किरण गावडे, कुसुम पुजारे, प्रशांत बांदिवडेकर, शितल धुरी, रेश्मा चव्हाण, नम्रता चव्हाण, सुप्रिया धुरी, कल्याणी मेस्त्री, गणेश गोसावी, सतीश धुरी, मोतीराम मेस्त्री, समिर माधव, नम्रता धुरी, वैभव राऊत, जुई पांचाळ, प्रतिभा गावडे, नम्रता तांबे या माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन ₹३१०००/- ( एकतीस हजार रुपये) जमा करून मजबूत असा गेट बनवून देऊन शाळेबद्दल आपले प्रेम व्यक्त केले आहे. मा. श्री. अनिलभाई कांदळकर, सर्व संचालक, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालकांच्या वतीने सन २००६-२००७ अ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद!

error: Content is protected !!