मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

रुन्मय शिरवलकर, शास्वत गाठे यांनी रौप्य पदक तर प्रद्युम्न मुळदेकर याला कास्यपदक

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधू रत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने ३५ वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा कुडाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकादमी कणकवलीच्या रुन्मय शिरवलकर आणि शास्वत गाठे यांनी रौप्य पदक मिळवले. तर प्रद्युम्न मुळदेकर याने कास्य पदक मिळवून सिंधुदुर्गच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे.

  हि स्पर्धा वासुदेवानंद सभागृह, कुडाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेत राज्य भरातून ४०९ तायक्वांदो खेळाडू सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ऋणमय शिरवलकर याने २७ किलो खालील वजनी गटात रौप्य पदक मिळवले तर शाश्वत गाठे याने ४१ किलो खालील वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळविले. प्रद्युम्न मुळदेकर याने ५० किलो वरील वजनी गटामध्ये कांस्यपदक पटकावले आहे. हे सर्व खेळाडू  कणकवली नगरवाचनालय येथील मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो – कुडाळ येथील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रुन्मय शिरवलकर, शास्वत गाठे यांनी रौप्य पदक मिळवले. तर प्रद्युम्न मुळदेकर याने कास्य पदक मिळविले आहे.

error: Content is protected !!