भाजपच्या महापालिकेतील यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई महापालिकेमधील यशाबद्दल खास दिल्या शुभेच्छा
राज्यात मुंबई सह बहुतांशी महानगरपालिकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर आज राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता खेचून भाजपने महायुतीची सत्ता आणल्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन नितेश राणे यांनी केले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन पंकजा मुंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.





