ब्ल्यू डार्ट दरोडे प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद
ब्ल्यू डार्ट कंपनीच्या कंटेनर वर दरोडा घालण्याच्या आरोपातून अटकेत असलेल्या राहुल अमित शिरसाट याची सत्र न्यायालयाने 50,000/- रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.
ब्ल्यू डार्ट कंपनीचा कंटेनर गोवा राज्यात जात असताना त्याचा पाठलाग करून दगड फेक करून कंटेनर लुटण्याचा प्रयत्न करण्या प्रकरणी ब्लू डार्ट कंपनी कडून फिर्याद कुडाळ पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्हि. एस. देशमुख यांनी आरोपी राहुल शिरसाट याला 50,000/- रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला.
ह्या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड. राजीव बिले, ॲड. दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी वराडकर, ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले.




