केंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी घालवला निसर्गाच्या सानिध्यात एकदिवस

नाही पुस्तक नाही शाळा निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.
यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला.
केंद्र शाळा आचरे नं 1 विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच अवांतर ज्ञान वृद्धि साठी विविध उपक्रम राबवित असते. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात रमता यावे.मुलांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तोंडवळी येथील रमनीय समुद्र किनारी वनभोजन सहल नेत मुलांनी एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवला. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, उद्योजक महेश राणे, अजित घाडी यांनी याठिकाणी भेट देऊन मुलांचा उत्साह वाढविला. यावेळी
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, उपाध्यक्ष श्रीम. दिपाली जितेंद्र कांबळी आदींच्या हस्ते त्यांचा सन्मान केला गेला.
या वेळी शाळा व्व्यवस्थापन समितीचे विष्णु भाटकर, संदीप पांगम, संतोष मेस्त्री, श्री. विलास आचरेकर, श्रीम. अर्पिता घाडी, श्रीम.सुजाता कामतेकर, श्रीम. प्राजक्ता घारे, श्रीम. अनिता पाटील, श्री. सिध्देश हळवे यांसह सर्व सदस्य, पालक, शिक्षक यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवुन सहकार्य केले. तसेच तोंडवळी बीच येथिल साई सागर रिसोर्टचे मालक दिपक कांदळकर, अवधूत कांदळकर यांनी आपल्या रिरिसोर्टची जागा उपलब्ध करुन देत सहकार्य केले.





