जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम

गणितीय पतंग महोत्सवातून सोडविल्या गणितीय क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने

सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने अभ्यासले.
या महोत्सवाच्या आयोजना मागे गणित सारख्या विषयातील निरसता कमी करून त्या विषयातील क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना आत्मसात करता याव्यात हा उद्देश ठेवण्यात आला होता. आडवली नं 1 शाळा ग्रामीण भागातील असून सतत नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन शाळेमध्ये केले जाते.
विद्यार्थ्यांना अनुभूतीयुक्त शिक्षण दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम बौद्धिक विकासावर होतात या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक श्रीम. तनुजा तांबे, श्रीम. रागिणी ठाकूर, श्रीम. वेदिका वाघाटे आणि श्री. रामचंद्र कुबल यांनी या गणितीय पतंग महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे
या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या लांबी रुंदी, क्षेत्रफळ किंवा परिमितीचे पतंग उदाहरणं सोडवून बनविले तसेच कटकोन त्रिकोणावर आधारित पायथा गोरस प्रमेयाचा उपयोग करून पतंग जमिनीपासून किती उंचीवर उडत आहे हे उदाहरणे सोडवून निश्चित केले.

error: Content is protected !!