जि. प., पं. स. निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत “हे” जोडावे लागणार कागदपत्र

तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांची माहिती
इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवा – जुळवा करण्यासाठी धावाधाव
जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडायची कागदपत्र हे निवडणूक विभागाकडून निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराचे शपथपत्र (परिशिष्ट 4 अ) मध्ये, पक्षातर्फे निवडणूक लढवीत असल्यास नमुना (दोन अ) (दोन ब), शौचालय वापराबाबतचे स्वयंघोषणापत्र किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राची सत्यप्रत, (राखीव जागांसाठी), जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी समितीची पोच व प्रत व हमीपत्र (राखीव जागांकरिता) उमेदवार अन्य गटातील /गणातील असल्यास मतदार यादीची प्रमाणित प्रत, महिला उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नाव बदलाचे राजपत्र, शपथपत्र. निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स प्रत, उमेदवाराचा पासपोर्ट फोटो दोन प्रति, उमेदवाराच्या सहीचा नमुना, तसेच मतपत्रिकेवरील नावाबाबतचे प्रमाणपत्र हे कागदपत्र सोबत जोडावे लागणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे कणकवली मधील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. दरम्यान उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी संध्या धावा – धाव सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





