जाणवली गावच्या श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव 16 जानेवारीला

विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
भक्तांचे श्रद्धा स्थान, भक्ताच्या हाकेला धावणारी – नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या जाणवली गावच्या श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. 3 वर्षांनी होणाऱ्या या गोंधळ उत्सवाची देवीचे भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. या गोंधळाची परंपरा खूप प्राचीन आहे, या गोंधळात खास आकर्षण असत ते खंडोबाचा वाघ्या लोखंडी साखळ दंड तोडतो त्या क्षणाच. सकाळी देवींची महाआरती, श्री चौडेश्वरी पूजन, नवस पूर्तता.
सायंकाळी जोगवा, मांड पूजा, दिवटी पूजा, साखळी तोडणे. रात्रौ मांडाची ओटी भरणे, महाप्रसाद, गोंधळ जागरण, उत्तर रात्री नामावळी, भाविकांची देवी चरणी गाऱ्हाणी आणि देवींची महाआरती करून सांगता. असा भव्य स्वरूपाचा सोहळा पार पडणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री भवानी देवी उत्सव समिती जाणवली – दळवीवाडी ता. कणकवली यांनी केले आहे.





