देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन बेजबदारपणा

फोंडाघाट रस्ता रुंदीकरणातील खड्ड्यात कार कोसळून अपघात
जनआंदोलनाचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा
देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्ट्रक्शन चा बेजबदारपणा वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतणार असून फोंडाघाट मध्ये घाटरस्ता रुंदीकरण साठी खोदण्यात आलेल्या चरात कार कोसळून अपघात घडला आहे. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असले तरी फोंडाघाटातून खोदलेल्या ह्या चरांमुळे भविष्यात आणखी अपघात होऊन जीवित वित्तहानी होण्याची शक्यता आहे. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही अक्षम्य दुर्लक्षपणा केला जात असून या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे. फोंडाघाट मधील घाटरस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन कडून सुरू आहे. व रुंदीकरण कामासाठी काही ठिकाणी खोल चर खोदण्यात आले आहेत. हे चर खोदल्यानंतर ये जा करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रोड डायव्हर्शन, दिशादर्शक फलक अथवा चरामुळे अपघात घडू नये यासाठी बॅरिकेटिंग करणे अत्यावश्यक आहे. चराभोवती केवळ सुरक्षेच्या पट्ट्या गुंडाळून ठेवणे म्हणजे ठेकेदाराने आपली जबाबदारी झटकून अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे. कोल्हापूर हुन कणकवलीच्या दिशेने व्हाग्नार कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कार या चरात कोसळून 8 जानेवारी रोजी रात्री अपघात घडला. सुदैवाने यव अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा निखिल कंट्रक्शन या कंपनीचा बेजबाबदारपणात पुन्हा समोर आला आहे. उत्खनन केलेल्या खड्ड्यांमध्ये वारंवार गाड्या कोसळून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तरीसुद्धा ठेकेदाराला जाणीव करून दिलेल्या गोष्टींची जाग येत नाही . ठेकदाराचा हा अक्षम्य बेजबदारपणा भविष्यात प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो. बेमुर्वत काम करून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या ठेकदारला वठणीवर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जनतेसोबत असल्याचे अनंत पिळणकर म्हणाले.





