भजन महर्षी चिंतामणी पांचाळ यांचा बारावा पुण्यस्मरण दिन 18 जानेवारी रोजी

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
भजन महर्षी गुरुवर्य चिंतामणी पांचाळ बुवा यांचा बारावा पुण्यस्मरण दिन स्वरचिंतामणी या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन रविवार 18 जानेवारी रोजी असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9.30 वाजता गुरूंच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी 10.30 वाजता व्यासपीठीय कार्यक्रम, सकाळी 11.30 वाजल्यापासून अखंडित भजन पुष्पांजली, दुपारी 1.30 वाजता स्नेहभोजन हे सर्व कार्यक्रम चिंतामणी पांचाळ यांचे निवासस्थान भरणी तालुका कुडाळ या ठिकाणी होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन परशुराम पांचाळ यांचे शिष्य परिवार व पांचाळ कुटुंबिय यांच्यावतीने करण्यात आले आहे.





