पालकमंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या वीज अधिकाऱ्यासोबतच्या बैठकीचा वर्षभरात रिझल्ट

वागदे गावसाठी स्वतंत्र फिडर मंजूर
सरपंच संदीप सावंत यांचा विशेष पाठपुरावा
वर्षभरापूर्वी कणकवली तालुक्यातील वीज वितरण च्या समस्या बाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून बैठक घेत दिलेल्या सूचनांची पूर्तता आता सुरू झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशामुळे आणि वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांच्या पाठपुराव्या मुळे वागदे ओसरगाव बॉर्डवे साठी विदयुत मंडळ कडून वेगळा फिडर मंजूर करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी प्रहार ऑफिस मध्ये वर्षभरापूर्वी वीज अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा सरपंच संदीप सावंत वेगळ्या फिडर ची मागणी केली होती. गेली कित्येक वर्ष वागदे मधून फिडर गेला होता. सदर फिडर वागदे, सतरलं, कासरल, वरवडे, बिडवाडी, रामगड, पिसेकामते, गोठाणे, निरोम आरे या सर्व गावांना गेला होता. त्या मुळे लोड होत होता. आणि कुठच्याही गावामध्ये लाईट ची समस्या आल्यावर या सर्व गावामधील लाईट बंद करून काम करावे लागत होते. आता वेगळा फिडर झाल्याने लोड कमी झाला आणि कुठच्याही एका गावामुळे इतर गावामधील लाईट बंद करून ठेवणे आवश्यक नाही. हा फायदा झाला आहे. या बद्दल वागदे सरपंच यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे व विदयुत मंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.





