रेडी विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून भव्य “स्नेह-संमेलन”

रेडी विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून भव्य “स्नेह-संमेलन” रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विकास हायस्कूल सभागृह, कन्नमवार नगर–२, विक्रोळी (पूर्व) येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता श्री देवी माऊली प्रतिमा पूजनाने होणार असून त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, आरती आदी. धार्मिक विधी संपन्न होतील. सकाळच्या सत्रात मंडळाचा आढावा, मान्यवरांचे सत्कार व मार्गदर्शनपर भाषणे आयोजित करण्यात आली आहेत.
दुपारच्या सत्रात महाप्रसाद, तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय मुलांचे सत्कार, बक्षीस समारंभ, आभार प्रदर्शन व हळदीकुंकू आदी. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्नेह-संमेलनास मंडळाचे अध्यक्ष, प्रा. डॉ. विकास प. राऊत, सचिव श्री. उल्हास सि. राणे व खजिनदार श्री. बाळकृष्ण ल. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून सर्व सभासद, हितचिंतक व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!